उमरखेड येथे वसतिगृहासाठी अर्ज आमंत्रित
यवतमाळ, दि. 23 : एकात्मिक आदिवासी विकास कार्यालय, पुसद अंतर्गत उमरखेड येथे मुलींच्या वसतिगृहाकरीता इमारतीची आवश्यकता आहे. आकर्षक सोयी-सुविधा असणाऱ्या इमारत मालकांनी इमारत वसतिगृहासाठी भाड्याने देण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
उमरखेड येथे 75 विद्यार्थिनींसाठी शासकीय वसतीगृह चालविण्यात येते. या वसतीगृहासाठी इमारतीची 10 बाय 12च्या 20 खोल्या, भोजनगृह, भोजनकक्ष, स्नानगृह 8 आणि स्वच्छालय 8, तसेच गृहपाल यांचे निवासस्थान असलेली इमारत पाहिजे आहे. संबंधित इमारत मालकाने वसतिगृहाकरीता इमारत भाड्याने देण्यासाठी एका महिन्याच्या आत आपले अर्ज गृहपाल कार्यालय, आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह उमरखेड येथे करावे, अधिक माहितीकरीता गृहपाल, आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, उमरखेड येथे संपर्क साधावा, असे गृहपाल यांनी कळविले आहे.
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी