जिल्ह्यात भाजीपाला पिकाचे क्लस्टर तयार करा
- हंसराज अहीर
यवतमाळ, दि. 23 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पारंपारिक शेतीसोबतच भाजीपाला पिकासारख्या जोडधंद्याची साथ देणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रमुख मार्गालगत असलेल्या गावातील शेतशिवारात भाजीपाला पिकाचे क्लस्टर तयार करा, असे निर्देश केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.        श्री. अहीर यांनी महसूल भवन येथे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प, पिककर्ज वाटप व पुनर्गठन, बि-बियाणे, रॅक पॉईंट, मुद्रा योजना, जलयुक्त शिवार आदींचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, डॉ.अशोक ऊईके, आ. राजू तोडसाम, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
रस्त्यालगतच्या गावांमध्ये भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतल्यास वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना सोईचे होईल. त्यामुळे अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांचे भाजीपाला पिकाचे गट तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. राष्ट्रीय केमिकल ॲन्ड फर्टिलायझर कंपनीच्यावतीने सीएसआर अंतर्गत जिल्ह्यातील 142 महिला लाभार्थ्यांना आर्थिक उत्पन्न वाढीसाठी शेळी व गाई पुरविण्यात येणार आहे. त्याचाही आढावा यावेळी घेण्यात आला. वाटप झाल्यानंतर महिलांना या जोडधंद्याचे अद्यावत प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र शासनाच्या आरसेटी या संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्याची सुचनाही त्यांनी केली. सीएसआर अंतर्गत जिल्ह्यात आणखी 500 कुटुंबांना गाई, म्हशी दिल्या जातील, असे ते म्हणाले.
पिककर्ज व पिक पुनर्गठणाचा आढावाही त्यांनी घेतला. जिल्ह्यात सर्व पात्र शेतकऱ्यांना पिककर्ज मिळाले पाहिजे, तसेच पुनर्गठनास पात्र शेतकऱ्यांचे पुनर्गठन करा, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील सोसायट्या नवीन सभासदांना पिककर्ज देत नसल्याचा अनेक तक्रारी असून या संस्थांना शेतकऱ्यांना सभासद करून पिककर्ज वाटपाचे आदेश द्यावे, असे निर्देशही त्यांनी सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यांना बियाणे आणि खते आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे, अशा सुचना त्यांनी कृषी विभागास केल्या. वणी, पांढरकवडा विभागातील शेतकऱ्यांना स्वस्तात आणि वेळेत खते उपलब्ध व्हावे म्हणून पिंपळखुटी रॅक पॉईंट सुरु करण्यात आला आहे. या पाँईंटवर रॅक लावण्याचे निर्देशही त्यांनी आरसीएफ व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी त्यांनी मुद्रा योजना व जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पाचाही आढावा घेतला.

00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी