सुरक्षा जवान भरती मेळावा
यवतमाळ, दि. 25 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ व भारतीय सुरक्षा परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी, दि. 27 आणि मंगळवारी, दि. 28 जून 2016 रोजी सुरक्षा जवान भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हा मेळावा जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र उद्योग भवन, तिसरा मजला, दारव्हा रोड, यवतमाळ येथे सकाळी 9 ते 3 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. सुरक्षा जवान या पदाकरीता उमेदवाराची शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण अशी असून उमेदवाराचे वय 18 ते 37 दरम्यान असावे. वजन 55 किलो, छाती 80 ते 85 सेंमी व उंची 168 / 167.5 सेंमी असावी. या पदाकरीता आठ हजार ते बारा हजार रूपयांपर्यंत राहिल. पात्र इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यास उपस्थित राहताना शैक्षणिक पात्रतेचे सर्व मुळ प्रमाणपत्र आणि साक्षांकित छायाप्रती, दोन फोटो, आधारकार्ड यासह उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी