कर्मचाऱ्यांचे सीएसआरएफ फॉर्म सादर करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 28 : राष्ट्रीय सेवा निवृत्ती योजनेंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांचे सीएसआरएफ फॉर्म कोषागार कार्यालयात तातडीने सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी यांनी केले आहे.
कर्मचाऱ्यांचे सीएसआरएफ फॉर्म कोषागार कार्यालयास सादर करावयाचे अद्यापही प्रलंबित आहेत, त्या कार्यालयांनी हे फॉर्म कोषागारातील डीसीपीएस शाखेत सादर करावे. या फॉर्म अभावी कर्मचाऱ्यांचे वेतन सेवार्थमार्फत जनरेट होणार नाही. प्रलंबित सीएसआरएफ फॉर्मची आहरण व संवितरण अधिकारी निहाय यादी कोषागार कार्यालयाच्या डीसीपीएस व लेखा परिक्षण शाखेत उपलब्ध आहे. या कार्यालयांनी सीएसआरएफ फॉर्म त्वरीत सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी ज्योती भोंडे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी