व्यवसायकर नाव नोंदणी अभय योजना
यवतमाळ, दि. 27 : राज्य शासनाने आपल्या अर्थसंकल्पात व्यवसायकर नाव नोंदणी अभय योजना जाहिर केली आहे. ही योजना केवळ अनोंदीत व्यावसायींकासाठी लागू असून ती दिनांक 30  सप्टेंबरपर्यंत अंमलात राहणार आहे.
योजनेंतर्गत नाव नोंदणी केल्यास दिनांक 1 एप्रिल 2013 पासूनच व्यवसायकर भरावा लागेल. पुर्वीचा व्यवसायकर व्याज व दंड पूर्णपणे माफ केला जातील. मागील तीन वर्षाचाच कर भरणा करावा लागतील. तसेच दिनांक 1 एप्रिल 2016 पासून 30 सप्टेंबर 2016 पर्यंतचा व्याज व दंड पूर्णपणे माफ होणार आहे. ही योजना संपल्यानंतर अनोंदीत असणाऱ्या व्यावसायींकावर होणारी कार्यवाही टाळावी. तसेच जास्तीत जास्त व्यावसायीकांनी याजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमरावती येथील विक्रीकर सहआयुक्त एस.एस.लोहार यांनी केले आहे.
योजनेंतर्गत www.mahavat.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून नाव नोंदणी करता येईल. याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा व्यवसायकर अधिकारी एम.एन.जोशी यांच्याशी 9225770083 किंवा joshi.ml@mahavat.gov.in या ई- मेलवर संपर्क साधावा, असे व्यवसायकर अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी