2 कोटी वृक्षलागवडीचा आज शुभारंभ
जिल्ह्यात एकाच दिवशी 17 लाख वृक्षारोपण
*नागरीकांना सहभागाचे आवाहन
यवतमाळ, दि. 30 : यवतमाळ वन आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या 2 कोटी वृक्ष लागवडीचा शुभारंभ रविवारी, दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 8.30 वाजता होणार आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वडगाव ते जांब रस्तावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम होईल. जिल्हाभरात एकाच दिवशी तब्बल 17 लाख वृक्ष लागवड होणार आहे. यात नागरीकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन वन आणि सामाजिक वनीकरण विभागाने केले आहे.
यावेळी केंद्रिय खते व रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वालबंन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, खासदार विजय दर्डा, भावना गवळी, राजीव सातव, आमदार माणिकराव ठाकरे, हरिभाऊ राठोड, संदीप बाजोरीया, ख्वॉजा बेग, श्रीकांत देशपांडे, मनोहर नाईक, मदन येरावार, राजू तोडसाम, राजेंद्र नजरधने, डॉ. अशोक उईके, संजिव रेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष सुभाष राय, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती लता खादवे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक सिंगला, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह उपस्थित राहतील.
या कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी होऊन वृक्ष लावण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य वनसंरक्षक वसंत गुरमे, उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, सामाजिक वनिकरणाचे उपसंचालक एम. आर. चेके, सहाय्यक वनसंरक्षक लक्ष्मण गाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर मडावी यांनी केले आहे.
पुसद वन विभागत अडीच लाख रोपे लावणार
पुसद वनविभागाला 2 लाख 48 हजार रोपे लागवडीचे उदि्दष्ट देण्यात आले आहे. या वृक्ष लागवडीसाठी एकूण 13 रोपवाटिकांमध्ये 25 प्रजातींच्या रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. पुसद वनपरिक्षेत्रात धुंदी जामणी येथील घाट वळणाच्या रस्त्याकाठी असलेल्या 10 हेक्टर रोपवन क्षेत्रात जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे. आमदार मनोहर नाईक, पुसद नगरपालिकेच्या अध्यक्ष माधवी गुल्हाने यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. येथे स्काऊट गाईड पथकाही सहभाग राहणार आहे. महागाव वनपरिक्षेत्रातील दगडथर येथे आमदार राजेंद्र नजरधने यांच्याहस्ते वृक्ष लागवडीचा शुभारंभ होणार आहे.
जिल्हा कारागृह परिसरात वृक्षारोपण
यवतमाळ येथील कारागृहाच्या परिसरात 800 रोपे लावण्यात येणार आहेत. सकाळी 9 वाजता पालकमंत्री यांच्या हस्ते वृक्ष लागवडीला सुरवात करण्यात येईल. त्यानंतर कारागृहाचा बगीचा, कारागृह परिसर, आणि कर्मचारी वसाहत याठिकाणी वृक्षरोपण करण्यात येईल. यावेळी कारागृह अधीक्षक एम. एच. जगताप, उपस्थित राहतील.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी