दोन मृत्युसह 318 जण पॉझेटिव्ह

 


Ø 258जण कोरोनामुक्त

            यवतमाळ, दि. 9 : गत 24 तासात जिल्ह्यात दोन मृत्युसह 318 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 258 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

            जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील 75 वर्षीय महिला आणि यवतमाळ तालुक्यातील 59 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या 318 जणांमध्ये 208 पुरुष आणि 110 महिला आहेत. यात पुसद 103, यवतमाळातील 63 रुग्ण, दिग्रस 56, वणी 23, बाभुळगाव 22, आर्णि 7, दारव्हा 7, कळंब 2, महागाव 10, मारेगाव 1, नेर 3, पांढरकवडा 8, उमरखेड 8, राळेगाव 1  आणि 4 इतर रुग्ण आहेत.

            मंगळवारी एकूण 1482 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 318 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1164 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1930 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 19743 झाली आहे. 24 तासात 258 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 17329 आहे. तर जिल्ह्यात एकूण 484 मृत्युची नोंद आहे.

            सुरवातीपासून आतापर्यंत 174998 नमुने पाठविले असून यापैकी 173327 प्राप्त तर 1671 अप्राप्त आहेत. तसेच 153384 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. 

००००००

Comments

  1. Why testing is not being increased rapidly?
    Sir MD singh also suggested to conduct 5000 test per day! but where is the implementation? At least stop /reduce the amount of damage and deaths

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी