पाच मृत्युसह 439 जण पॉझेटिव्ह

 


Ø 321 जण कोरोनामुक्त

       यवतमाळ, दि. 25 : गत 24 तासात जिल्ह्यात पाच मृत्युसह 439 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 321 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

            जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 80 वर्षीय पुरुष, 68 आणि 64 वर्षीय महिला, दिग्रस येथील 65 वर्षीय पुरुष आणि दारव्हा तालुक्यातील 52 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच आज (दि.25) पॉजिटिव आलेल्या 439 जणांमध्ये 318 पुरुष आणि 121 महिला आहेत. यात यवतमाळातील 139, दिग्रस 85, पुसद 52, उमरखेड 40, आर्णि 26, पांढरकवडा 23, नेर 15, महागाव 14, घाटंजी 12, वणी 12 बाभुळगाव 7, मारेगाव 5, दारव्हा 3, कळंब 2, झरीजामणी 2 आणि इतर शहरातील 2 रुग्ण आहे.

            गुरुवारी एकूण 5324 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 439 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4885 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2524 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 26275 झाली आहे. 24 तासात 321 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 23155 आहे. तर जिल्ह्यात एकूण 596 मृत्युची नोंद आहे.

            सुरवातीपासून आतापर्यंत 248646 नमुने पाठविले असून यापैकी 239182 प्राप्त तर 9664 अप्राप्त आहेत. तसेच 212707 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी