राळेगाव येथे १० फेब्रुवारीला रोजगार मेळावा

यवतमाळ, दि ७ फेब्रुवारी (जिमाका) :- जिल्हाकौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ अंतर्गत मॉडेल करीयर सेंटर व शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राळेगाव यांचे संयुक्त विद्यमाने १० फेब्रुवारी २०२३ रोजी शासकिय औद्योगिक प्रशिक्षणसंस्था, राळेगाव येथे सकाळी १० वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर रोजगार मेळाव्याकरीता एकूण १८१५ रिक्तपदे अधिसुचित करण्यात आली आहे. सदरची रिक्तपदे ही एल आय सी ऑफ इंडिया, हिंगणघाट, धुत ट्रान्समिशन, औरंगाबाद, परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रा.लि. औरंगाबाद/पुणे, जय ॲग्रो इंडस्ट्रिज प्रा.लि.यवतमाळ, नवकिसान बायोप्लँटेक लि. नागपूर, स्वतंत्र मायक्रो फायनांन्स प्रा.लि. राळेगाव, तिरुमला इंडस्ट्रिएल ॲण्ड अलाईड सर्व्हिसेस ग्रुप ऑफ कंपनी, पुणे, मुथुत मायक्रो फायनांन्स प्रा.लि.यवतमाळ, ब्रेनसिटर प्रा.लि.पूणे, एस बी.आय लाईफ इन्सुरन्स,यवतमाळ,मेगाफिड बायोटेक, नागपूर, इंदुजा महिला मिल्क प्रॉडयुस कंपनी, यवतमाळ येथील आहेत. सदर मेळाव्यामध्ये इयत्ता १० वी, १२ वी, आय.टि.आय. पदविकाधारक, पदवीधर तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पुर्ण केलेले ईच्छुक उमेदवारांना रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहुन यासंधीचा लाभ घेता येणार आहे. सदर मेळाव्यात उद्योजकांकडून उमेदवारांची प्रत्यक्ष थेट मुलाखतीव्दारे रिक्त पदांकरीता निवड करण्यात येणार आहे. तरी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायकआयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी