अवैध गर्भपाताची माहिती देणाऱ्या आशा व अंगणवाडी सेविकांना जिल्हा प्रशासनाकडून एक लाख रुपयाचे बक्षीस* *जिल्हाधिकारी यांची माहिती* *आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा घेतला आढावा*

यवतमाळ, दि १४ फेब्रु जिमाका:- जिल्ह्यात लिंग गुणोत्तर प्रमाण ९८० असले तरी पुसद व घाटंजी या तालुक्यात हे प्रमाण ८७८ एवढे कमी आहे. ही बाब चिंताजनक असुन जिल्ह्यात अवैध गर्भपाताबाबत माहिती देणा-या आशा व अंगणवाडी सेविकांना शासनाच्या एक लक्ष रुपयांसोबतच जिल्हा प्रशासनाकडुनही १ लक्ष रुपये बक्षिस देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाच्या विविध योजना व कार्यक्रमाचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकिला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर डी राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी रमा बाजोरिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रमोद सुर्यवंशी उपस्थित होते. गर्भपात केंद्रामध्ये अवैधरित्या गर्भपात केला जात आहे किंवा अपात्र व्यक्ती गर्भपात करीत असेल तर त्याबाबतची माहिती देणाऱ्यास शासनाकडून एक लक्ष रुपयाचे बक्षीस दिले जाते. यामध्ये जिल्हाधिकारी यांनी भर घालत अवैध गर्भपाताची माहिती देणाऱ्या आशा व अंगणवाडी सेविकांना जिल्हा प्रशासनाकडून आणखी एक लक्ष रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. म्हणजे आशा व अंगणवाडी सेविकांनी अवैध गर्भपाताची माहिती दिल्यास त्यांना शासनाकडुन १ लक्ष व प्रशासनाकडुन १ लक्ष असे २ लक्ष रुपयांचे बक्षीस दिले जाईल. तसेच त्यांचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. अवैध गर्भपाताची माहिती www.amachimulagi.gov.in तसेच १८००२३३४४७५ या टोल फ्री क्रमांकावर तसेच जिल्हा शल्य चिकित्सक ०७२३२- २९५१५९ या क्रमांकावर द्यावी असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले. राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्याच्या सुचना देतानाच या कार्यक्रमांतर्गत सुरु करण्यात आलेल्या मैत्री क्लिनीक सक्रियपणे सुरु ठेवाव्या. गुड टच, बॅड टच, तसेच पोस्को, लैगिक शिक्षण इत्यादी कार्यक्रम सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये महिला व बाल विकास विभागासोबत मोठ्याप्रमाणात राबविण्यास सांगितले. प्रत्येक शाळेत आरोग्यवर्धीनी, संदेशवाहक नियुक्त करावेत. तसेच दर मंगळवारी आरोग्य दिवस निश्चित करुन विद्यार्थ्याना या विषयाची माहिती द्यावी. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेताना जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे आणि यासाठी दोनशे रुपये दंडात्मक कारवाईबाबतचे फलक पान टपरी बसस्थानक, चहा टपरी व सर्व सार्वजनिक ठिकाणी लावण्याचे आदेश दिलेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी धाडसत्र राबवावे. जनजागृतीसाठी चित्रकला, निबंध, पत्रलेखन स्पर्धा आयोजित कराव्यात. आश्रम शाळेत तसेच बालगृहात मौखिक तपासणी करून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. यावेळी त्यांनी जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंध कार्यक्रम, जिल्हा क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, सुमन कार्यक्रम, गुणवत्ता नियमन कार्यक्रम, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान इत्यादी योजना व कार्यक्रमाचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, सर्व तालुका आरोग्य अधिकारी व कार्यक्रम समन्वयक उपस्थित होते. ०००००००० *५० वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन १६ फेब्रुवारीला* यवतमाळ,दि. १४ फेब्रुवारी (जिमाका):- एनसीआरटी नवी दिल्ली भारत सरकार व प्रादेशिक विद्या प्राधिकरण राज्यविज्ञान शिक्षण संस्था नागपूर यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२२-२३ चे आयोजन १६ व १७ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत राणी लक्ष्मीबाई व विवेकानंद विद्यालय,यवतमाळ येथे करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनात तालुक्यातून निवड झालेले एकूण १७६ प्रयोग प्रतिकृतींचे प्रदर्शन दोन दिवसीय कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व तालुक्यातील निवडप्राप्त विद्यार्थी, शिक्षक, प्रयोगशाळा परिचर यांनी आपली वैज्ञानिक प्रतिकृती तयार करुन उपस्थित राहावे,असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जयश्री राऊत व यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी