जिल्हा बाल संरक्षण कक्षाने रोखला बालविवाह* *जिल्हा बाल संरक्षण कक्षाने केली वेळीच कारवाई*

यवतमाळ,दि ९ फेब्रुवारी(जिमाका) :- उमरखेड तालुक्यातील सोयीट या गावी अल्पवयीन मुलीचा होत असलेला बालविवाह जिल्हा बाल संरक्षण कक्षाने वेळीच कारवाई केल्यामुळे रोखण्यात यश मिळाले. सोयीट गावात बालविवाह होत असल्याबाबत गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षास प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे माहिती विश्लेषक सुनिल बोक्से यांनी तातडीने सोयीट(म)पो.धानोरा,बिटरगाव यागावी भेट दिली. जिल्हा बाल संरक्षणकक्षा द्वारे बिटरगाव पोलीस स्टेशन उमरखेड जिल्हा यवतमाळ व चाईल्ड लाईन १०९८ यवतमाळ यांना नियोजित बालविवाह बाबत माहिती देण्यात आली. अल्पवयीन बालिकेच्या कुटुंबास प्रत्यक्ष भेट देऊन बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ व बालविवाह झाल्यास बाल विवाहप्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत शिक्षेस पात्र होऊ शकते याची माहिती देण्यात आली. बालिकेच्या मामाकडून बालिकेचा विवाह १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर करणात यावा असा जवाब लिहून घेण्यात आला. त्याप्रमाणे सूचना पत्र आणि बिटरगाव पोलीस स्टेशन उमरखेड यांच्याद्वारे १४९ ची नोटीस सुद्धा देण्यात आली आहे. सदर बालविवाह थांबविण्यास बिटरगाव पोलीस स्टेशन उमरखेडचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप भोस, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे माहिती विश्लेषक सुनिल बोक्से,चाईल्ड लाईनचे सदस्य दिलीप दाबडेकर व पूनम कनाके गावातील सरपंच कल्पना नाईक, ग्रामसेवक शेख फरीद शेख लालम,अंगणवाडी सेविका सुनिता मारोती खंडारे यांच्या उपस्थितीत कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाही जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ज्योती कडू, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हापरीविक्षा अधिकारी रवींद्र गजबिये संरक्षण अधिकारी अविनाश पिसुर्डे तातडीने कारवाई करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी