राष्ट्रीय लोक अदालतीचे ११ फेब्रुवारीला आयोजन*

यवतमाळ, दि. ९ फेब्रुवारी (जिमाका):- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथे ११ फेब्रुवारीला सकाळी साडेदहा वाजता तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये येथे राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेले तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे,भुअर्जन मामल्याची प्रकरणे, महसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद प्रकरणे, बॅका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे व तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित व दाखलपुर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघणार आहे. सदर लोकअदालतीमध्ये वाद मिटविण्याकरिता न्यायाधीश, तज्ञ वकील व सामाजीक कार्यकर्ते यांचे मंडळ पक्षकार मदत करेल. तसेच लोकअदालतीमध्ये प्रकरण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. सर्व पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालतमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील इतर तालुका न्यायालयांत संपर्क साधुन आपली जास्तीत जास्त प्रकरणे आपसी तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन एस. व्ही. हांडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ आणि अमित ए. बदनोरे, अध्यक्ष, जिल्हा वकील संघ, यवतमाळ यांनी केले आहे. .ooooooooo*. जागृक पालक, सुदृढ बालक अभियान, महाआरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर व हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा शुभारंभ* यवतमाळ दि. ९ :- जिल्ह्यात नागरी आरोग्य केंद्र पाटीपूरा येथे आरोग्याच्या विविध योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. जागृक पालक, सुदृढ बालक अभियान, महाआरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर व हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी दुरदृष्य प्रणालीव्दारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे सर्व आरोग्य योजनांचे राज्यस्तरीय शुभारंभाचे प्रसारण करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.डी.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डी.बी.गाढवे, माता बाल संगोपण अधिकारी डॉ.पी.एस.ठोंबरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज तगडपल्लेवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.रमा बाजोरीया, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नावंदीकर, डॉ.प्रशांत पवार, डॉ.हर्षलता गायनार, डॉ.प्राची चक्करवार, डॉ.नाझीया, डॉ.संजना लाल, डॉ.निलेश लिचडे, डॉ.प्रिती दुधे, प्रशांत पाटील उपस्थित होते. सदर कार्यक्रमात प्रास्ताविकपर भाषणात माहिती देतांना डॉ.पी.एस.चव्हाण म्हणाले, जागृक पालक सुदृढ बालक या अभियानात जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील जवळपास सात लक्ष बालकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक ते उपचार करण्यात येतील. तसेच सर्व शाळा, अंगणवाडी, आश्रमशाळा, अपंग विद्यालय अशा ठिकाणी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी जाऊन मुलांची तपासणी करणार. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.डी.राठोड यांनी उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, प्रा.आ.केंद्र या ठिकाणी आयोजित केलेल्या आरोग्य शिबीराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच ठिकठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने लोकांनी रक्तदान करावे. आरोग्य मंत्री यांच्या घोषणेनूसार जिल्ह्यातील हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेच्या शुभारंभ याप्रसंगी करण्यात आला. जागृक पालक सुदृढ बालक हे अभियान जिल्ह्यात साठ दिवस राबविण्यात येणार असून या अभियानाचा दैनंदिन अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. नागरी आरोग्य केंद्र पाटीपूरा येथे कार्यक्रमप्रसंगी परिसरातील नागरीक, नगरपरिषद शाळेतील विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध विभागाच्या सहकार्याने आरोग्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रिती बागडे तर आभार प्रदर्शन डॉ.हर्षलता गायनार यांनी केले. शितल फिलीप, राठोड सिस्टर, उमी शेख, निता आडे, कुंभेकर, के.एस.कुळकर्णी, चव्हाण, तेजस्विनी नगराळे, पोर्णिमा गजभिये, मनिषा तिरपुडे, धिरज पिसे, खंडारे, कांबळे यांचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी