जिल्हास्तरीय “शेजार युवा संसद” कार्यक्रम जाजू महाविद्यालय येथे संपन्न* * काळानुसार युवकांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे* *- ललितकुमार व-हाडे*

यवतमाळ,दि.३ मार्च.(जिमाका):-काळात सतत बदल होत आहे. काळानुसार युवकांनी नवे तंत्रज्ञान व नव्या गोष्टी आत्मसात करणे आवश्यक आहे. सध्या देशात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे केले जात असतांना युवाकांनी तृणधान्य काय आहे व याचा रोजच्या आहारात उपयोग व आरोग्यास किती फायद्याचे आहे याबाबत माहिती घ्यावी. तसेच आपल्या देशात जी-२० परिषद होत असतांना युवकांनी या परिषद बाबात जाणून घेतले पाहिजे,असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रंसगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले. संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने जी-२० परिषद व तृणधान्य या विषयावर नेहरू युवा केंद्र,युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय,भारत सरकार यांच्या संयुक्त माध्यमातून जिल्हास्तरीय “शेजार युवा संसद” कार्यक्रमाचे आयोजन जाजू महाविद्यालय येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास जाजू एज्युकेशन संस्थेचे प्रकाश जाजू, सचिव आशिष जाजू, कोषाध्यक्षा शिल्पा जाजू, अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राममनोहर मिश्रा, कॉलेज ऑफ मॅनेजमेन्ट ॲण्ड कॉम्युटर सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य रितेश चांडक तसेच प्रमुख मार्गदशक बाबाजी दाते कला वाणिज्य महाविद्यालयाचे डॉ.ताराचंद कंठाळे, अमरावती विद्यापीठाच्या गृहशास्त्र विभाग प्रमुख डॉ.वैशाली धनविजय यांची कार्यक्रमास उपस्थिती होती. यावेळी पौष्टिक तृणधान्य व जी-२० या विषयावर तज्ञ मार्गदर्शकांनी महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनींना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. “अतिथी देव भव” या वर लोक संस्कृतीला अनुसरून महाविद्यालयीन विद्यार्थांकडून लोकनृत्य सादर करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी