'शासकिय योजनांची जत्रा' चित्ररथाचे पालकमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम

यवतमाळ, दि ३१ मार्च :- सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'शासकिय योजनांची जत्रा' चित्ररथाला अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उद्द्घाटन केले तसेच हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे उपस्थित होत्या. अनुसुचीत जातीच्या नागरिकांना समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती मिळावी म्हणुन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. यात कलापथक, चित्ररथ, रेडिओ जिंगल्स, फ्लेक्स, घडिपत्रिका इत्यादी माध्यमांचा वापर करण्यात येतो. सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती लोकांना व्हावी यासाठी तयार करण्यात आलेला चित्ररथ ३५० गावांमध्ये ४४ दिवस फिरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी चित्ररथाच्या माध्यमातुन योजनांची माहिती करुन घ्यावी असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती