खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण घेण्याचे आवाहन

यवतमाळ,दि.३१मार्च (जिमाका):- माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या जिल्हा, विभाग,राज्यस्तरीय क्रीडा स्तरावरील क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या तसेच राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या व सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. सदर क्रीडा गुण सवलत मिळवण्यासाठी खेळाडू हा इयत्ता १० वी व १२ वी शालांत परीक्षेला सर्व विषय घेऊन प्रविष्ट होणारा असावा. जिल्हा विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त क्रीडा स्पर्धेत प्राविण्य असावे. तसेच शालेय व संघटनेच्या क्रीडा स्पर्धा कालावधी हा १जून ते २८ फेब्रुवारीचा असावा. प्रति विद्यार्थी रुपये २५ तपासणी शुल्क म्हणून घेण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे. सदरचे तपासणी शुल्क आपण या कार्यालयातून आपले ग्रेस गुण प्रस्ताव शिफारस करतेवेळी अमरावती विभागीय मंडळ यांचे नावे रक्कम भरणा केलेल्या बँक चलनाची प्रत जोडणे आवश्यक आहे. या अटीवर प्रस्ताव स्वीकारण्यात येईल. कार्यालयात प्रस्ताव सादर करताना परिशिष्ट ई,क्रीडा गुण सवलतीचा विहित नमुन्यातील अर्ज,परिषदचे हॉल तिकीट,ओळखपत्र आणि स्पर्धेचे उच्चतम कामगिरीचे प्रमाणपत्र, परिशिष्ट १०, संघटनेकरिता असे मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्या शिफारस पत्रासह सर्व कागदपत्रे साक्षांकित करून २ प्रतीत प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी,कार्यालय यवतमाळ येथे व्यक्तीश सादर करावा. तसेच एकविध खेळाच्या जिल्हा व राज्य संघटनेने शासन नियमानुसार माहिती आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे व क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सादर करावे. तसेच जिल्हा संघटना यांनी परिशिष्ट १० व प्रतिज्ञापत्र या कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे. जेणेकरून संघटनेचे प्रस्तावाची छाननी करणे सुलभ होईल.तरी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय यांनी १५ एप्रिल पर्यंत कार्यालयीन वेळेत परिपूर्ण प्रस्ताव कार्यालयात सादर करण्यात यावे. अपूर्ण प्रस्ताव सादर केल्यास सदर प्रस्तावाची कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी व अधिक माहितीकरिता या कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी पात्र खेळाडू, विद्यार्थी सवलत गुणापासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी