उदयोन्मुख उद्योजकांना बॅंकांनी कर्ज उपलब्ध करुन द्यावे -जिल्हाधिकारी अमोल येडगे

यवतमाळ, दि १६ मार्च:- जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी नवीन उद्योजक तयार होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या विविध योजनेतून उद्योग स्थापित करू इच्छिणाऱ्या उदयोन्मुख उद्योजकांना बँकांनी सकारात्मक दृष्टिकोनातुन कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल जिल्हास्तरीय बँकिंग समितीच्या बैठकित दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीला रिझर्व बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक शशांक हरदेनिया, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक दीपक पेंदाम, युनियन बँकेचे उपमहाप्रबंधक प्रदीप ठाकूर, बँक ऑफ बडोदाचे मुख्य प्रबंधक आर.एम सोमकुवर, आरसेटीचे विजयकुमार भगत, बँक ऑफ इंडियाचे श्री पाटील, जिल्हा बँक व्यवस्थापक अमर गजभिये, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री निकम, तसेच मावीम, उमेद,आणि विविध महामंडळाचे अधिकारी बॅंकांचे अधिकारी उपस्थित होते. नवीन उद्योजकांनी उद्योग सुरू करण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाची बँकांनी योग्य तपासणी करून कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी. तसेच सर्व कर्ज प्रकरणात बॅंकांनी प्रस्ताव नाकारण्याची कारणे संबंधित अर्जदाराला कळवावित. मार्च अखेर पर्यंत सर्व प्रलंबित कर्ज प्रस्ताव निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. त्याचबरोबर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग प्रक्रिया योजनेअंतर्गत सादर होणारे प्रस्ताव कृषी महोत्सवापूर्वी निकाली काढण्यात यावे. प्रत्येक बँकेच्या प्रत्येक शाखेकडे किमान 50 प्रस्ताव पुढील दोन महिन्यात कृषी अधिकारी यांनी पाठवावेत असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांनी या बैठकित पिककर्ज, पी एम स्वनिधी, शासन अनुदानित योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, अशा विविध विषयांचा आढावा घेतला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील पात्र लाभार्थी शेतक-यांचे आधार सिडिंग आणि ई केवासी करण्याचे काम बॅंक स्तरावर पूर्ण करायचे आहे. पुढिल १५ दिवसात हे काम बँकांनी पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्यात पीएम सोनेरी अंतर्गत दिलेला लक्षांक 20 तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी