पालकमंत्र्यांनी केली शिवभोजन थाळी केंद्राची पाहणी
v शहरातील व रुग्णालयातील गरजू लोकांनी लाभ घेण्याचे आवाहन
यवतमाळ, दि.
30 : संचारबंदीच्या काळात शहरातील नागरिकांची तसेच रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांची
गैरसोय होऊ नये म्हणून राज्य शासनाने पाच रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली
आहे. या अनुषंगाने राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री
संजय राठोड यांनी स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शिवभोजन थाळी
केंद्राची पाहणी केली. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.एन.सिंग,
डॉ. मिलिंद कांबळे, केंद्राचे संचालक विकास क्षीरसागर आदी उपस्थित होते.
कोरोना
विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. शिवाय
संचारबंदीसुध्दा लागू करण्यात आली आहे. याचा फटका रुग्णालयातील रुग्णांच्या
नातेवाईकांसह शहरातील इतर गरजू नागरिकांना बसत आहे. त्यामुळे शासनाने पाच रुपयात
शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली आहे. शासनाकडून रोज 200 थाळी देण्यात येते. मात्र
तरीसुध्दा ज्यांची काहीच सोय होत नसेल त्या सर्वांचा जेवणाचा खर्च
पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनात असलेल्या माँ आरोग्य सेवा समितीमार्फत करण्यात
येईल. या शिवभोजन थाळीचा शहरातील तसेच रुग्णालयातील गरजू लोकांनी लाभ घ्यावा, असे
आवाहनही त्यांनी केले आहे. यावेळी राजू गिरी, विजय कठाळे, रवि जाधव, गजानन निघोट व
आदी उपस्थित होते.
००००००००

Comments
Post a Comment