केळापुर तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयाला जिल्हाधिका-यांच्या भेटी





यवतमाळ, दि. 4 : केळापूर तालुक्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय तसेच दुय्यम निबंधक कार्यालयाला जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली.
यावेळी त्यांनी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागास भेट देऊन धान्याचे ऑनलाईन वाटप किती आहे. उर्वरीत लाभार्थ्यांचे ऑनलाईन वाटप का होत नाही, याबाबत विचारणा केली. कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांची सेवापुस्तके अद्ययावत ठेवून त्यांचे स्कॅनिंग  करावे. तहसील कार्यालयातून सर्व ऑनलाईन प्रमाणपत्र दररोज वाटप करण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना प्रमाणपत्रासाठी वारंवार चकरा मारावे लागणार नाही, याची दक्षता घ्या. रोजगार हमी विभागांतर्गत किती ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू आहेत तसेच उर्वरीत ग्रामपंचायतीमध्ये अद्याप कामे का सुरू झाली नाही, अशी विचारणा करून रोहयोची कामे तात्काळ सुरू करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
अभिलेख कक्षात जाऊन आतापर्यंत किती अभिलेख स्कॅनिंग झाले. तसेच स्कॅनिंग झालेल्या अभिलेखाची प्रत कशी काढतात याचे प्रात्यक्षिक संबंधित कर्मचा-याला करायला लावले. तहसील कार्यालयातील सर्व दस्ताऐवज व्यवस्थित लावून घ्यावे व स्वच्छता ठेवावी, असेही निर्देश त्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिका-यांनी पंचायत समितीच्या कार्यालयातील सर्व शाखांची पाहणी केली. दुय्यम निबंधक कार्यालयात भेट देऊन खरेदीचे व्यवहार का बंद आहे, याबाबत चौकशी करून दस्तऐवज व्यवस्थित ठेवण्याच्या सुचना दिल्या. टिपेश्वर अभयारण्य पुनर्वसनाच्या विषयावर सर्व संबंधित अधिका-यांशी जिल्हाधिका-यांनी चर्चा केली. यावेळी वन विभागाचे श्री. पुराणिक, तहसीलदार सुरेश कन्हळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : केळापूर तहसील कार्यालयातील कामाची पाहणी करतांना
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी