विलगीकरण कक्षातील दोघांना सुट्टी......व्हीसीद्वारे जिल्हाधिका-यांनी घेतला तालुक्याचा आढावा


v चार जण विलगीकरण कक्षात तर 101 जण होम कॉरेंटाईन
यवतमाळ, दि. 25 : येथील स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात निगराणीखाली (प्रिझमटिव्ह केसेस) असलेल्या दोघांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र त्यांना होम कॉरेंटाईन राहण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. विलगीकरण कक्षात आता चार जण असून यापैकी तीन जण पॉझेटिव्ह आहेत. त्यांची प्रकृती स्थीर आहे. तसेच विलगीकरण कक्षात दाखल इतर एका जणाचे नमुने नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चाचणीकरीता पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सांगितले.
जिल्ह्यात विविध ठिकाणी 101 जण होम कॉरेंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर आरोग्य पथकाच्या माध्यमातून तसेच पोलिस पथकाच्या माध्यमातून निगराणी ठेवली जात आहे. होम कॉरेंटाईन असलेल्या नागरिकांनी इतरांच्या संपर्कात येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 
००००००
वृत्त क्र. 235
व्हीसीद्वारे जिल्हाधिका-यांनी घेतला तालुक्याचा आढावा
v एसडीओ, टीएचओ, तहसीलदार, ठाणेदारांना सुचना
यवतमाळ, दि. 25 : कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी व्हीसीद्वारे तालुका प्रशासनाचा आढावा घेतला. यात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी व ठाणेदार यांना संचारबंदीच्या अनुषंगाने सुचना केल्या.
सर्व अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू राहाव्या व कुठेही गर्दी होणार नाही, यापध्दतीने तालुका प्रशासनाने  नियोजन करावे. बाजार एका ठिकाणी न भरवता तातडीने व इतर माध्यमांद्वारे वितरण व्यवस्था करण्यात यावी. तालुक्यातील कॉल सेंटर चोविस बाय सात सुरू ठेवावे. उपविभागीय अधिकारीसह सर्व तालुका प्रशासनाने प्रत्यक्ष फिल्डवर जावून काम करावे. दिवसातून किमान दोनदा शहरात फेरफटका मारावा. कायदा व सुव्यवस्था राखून प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी.
उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना इंन्सिडंट कमांडर म्हणूनप प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करावा. निवृत्त डॉक्टर्स, सैन्यातील व्यक्ती, अर्धसैनिक दलाचे जवान यांची माहिती गोळा करावी.  पुणे, मुंबई व इतर मोठ्या शहरातून आलेल्या नागरिकांना 14 दिवस घराबाहेर न पडण्याच्या सुचना द्याव्यात. तसेच त्यांची नियमित आरोग्य तपासणी करावी. लक्षणे आढळून आल्यास त्यांना त्वरीत भरती करावे व प्रशसनाला याची माहिती द्यावी. आपापल्या वाहनावर लोकांना जनजागृती करण्याबाबतची सिस्टीम बसवावी आदी सुचना जिल्हाधिका-यांनी केल्या.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी