जिल्ह्यातील ‘होम क्वारेंटाईन’ ची संख्या 88 वर


v विलगीकरण कक्षात निरीक्षणाखाली असलेल्या एकाचे नमुने निगेटिव्ह
यवतमाळ, दि. 26 : जिल्ह्यात विदेशातून आलेले तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ‘होम क्वारेंटाईन’ ठेवण्यात आले होते. 22 मार्च रोजी जिल्ह्यात दीडशेपार गेलेला हा आकडा आज (दि.26) 88 पर्यंत खाली आला आहे. होम क्वारेंटाइनच्या परिघाबाहेर आलेल्या नागरिकांना घरातच राहून काळजी घेण्याच्या सुचना प्रशासनाने दिल्या आहेत.
विलगीकरण कक्षात निगराणीखाली (प्रिझमटिव्ह केसेस) असलेल्या एकाचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. मात्र त्यांना लक्षणे असल्यामुळे सुट्टी देण्यात आली नाही. विलगीकरण कक्षात एकूण चार जण असून यापैकी तीन जण पॉझेटिव्ह आहेत. त्यांचे नमुने आज पुन्हा नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चाचणीसाठी पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सांगितले.
०००००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल