शिवभोजन केंद्राला विभागीय आयुक्तांची भेट



यवतमाळ दि.13 : यवतमाळ शहरातील स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शिवभोजन केंद्राला विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे आदी उपस्थित होते.
शिवभोजन केंद्राची पाहणी करून विभागीय आयुक्त यांनी समाधान व्यक्त केले. तसेच सद्यास्थितीत किती थाळीची मान्यता आहे, जेवणाचा दर्जा कसा आहे आदीबाबत विचारणा केली. सद्यस्थितीत थाळींची संख्या कमी पडत असून अनेकांना भोजनाचा लाभ मिळत नाही, असे निदर्शनास आणून दिल्यावर विभागीय आयुक्त यांनी वाढीव थाळींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सुचना केल्या.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी शालिकराम भराडी, केंद्र संचालक विकास क्षिरसागर उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल