माहे एप्रिल मध्ये शेतकऱ्यांना 110 केंद्रावर मार्गदर्शन



बळीराजा चेतना अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
यवतमाळ दि.5 : बळीराजा चेतना अभियान अंतर्गत माहे एप्रिलमध्ये जिल्ह्यातील 110 केंद्रांवर शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याबाबत करावयाच्या कार्यवाहीचा आढावा आज जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी घेतला.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुळकर्णी, अपर जिल्हाधिकारी सुनिल महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्री, रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, सहाय्यक निबंधक अर्चना माळवे प्रामुख्याने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजना, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, खरिप कर्ज वाटप योजना, ग्रामीण रोजगार हमी योजना, रेशीम उद्योग योजना, गट शेती योजना, रमाई आवास योजना, आरोग्य व कृषी विषयाशी संबंधीत योजनांची माहिती पॉवर पॉइंट प्रेझेटेशनद्वारे तसेच व्हीडीओद्वारे देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी विविध विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
०००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी