जिल्हयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी नोडल अधिकारी नियुक्त


यवतमाळ दि. 27 : जिल्हयात कोरोना (कोव्हिड – १९) च्या संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरीता जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी नोडल अधिकारी नियुक्त केले आहे. यात पोलिस विभागाशी संबंधित जबाबदारी, आरोग्य विभाग, उप-प्रादेशिक विभाग तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, कृषी, उद्योग, सहकार विभाग, पुरवठा विभाग, गॅस एजंन्सी, भाजीपाला, किराणा दुकान, पेट्रोल एजंसी, हॉटेल्स व रेस्टॉरंट आदी विभागाशी संबंधित जबाबदा-यांचा समावेश आहे. तसेच तक्रारी व निवेदने स्वीकारण्याकरीतासुध्दा नोडल अधिका-याची नियुक्ती करण्यात आली आहे.
नोडल अधिका-यांनी  त्यांना वाटप केलेल्या संबंधित विभागाशी समन्वय साधने व आवश्यक माहिती प्राप्त करून घेणे, नागरिकांकड़न आवश्यक गरजांच्या पुर्तीकरीता आलेल्या तक्रारींचे निरसण करणे, जिल्हयात 24 तास अखंडीत सेवा पुरविल्या जातात याची खात्री करणे, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करणे, आवश्यक मनुष्यबळ व सेवा यांचे योग्य व्यवस्थापन होते आहे  की नाही, याची खात्री करणे, शासन स्तरावरून व जिल्हा प्रशासनाद्वारे प्राप्त आदेशाचे पालन संबंधित विभागाकडून करून घेणे, जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने अत्यावश्यक बाबींच्या पुर्ततेकरीता सर्व विभागाशी समन्वय साधून काम करणे, आपात्कालीन परिस्थिती हाताळणे, जिल्हयातील सर्व भागात पाणी पुरवठा, वीज पुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, गॅस सेवा व इतर जीवनावश्यक वस्तुंच्या पुर्ततेकरीता इतर विभागाशी तातडीने समन्वय साधून त्या पूर्ण करून घेणे आदी जबाबदाऱ्या नोडल अधिका-यांकडे सोपविण्यात आल्या आहेत. 
वरील सेवा पुर्ततेसंदर्भात अडचण निर्माण झाल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाला कळविण्यास जिल्हाधिकारी एम.डी.सिंह  यांनी आदेशित केले आहे.
००००००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद