रात्री आठ वाजतानंतर हॉटेल रेस्टॉरंट बंद न केल्यास सील होणार


v महसूल व पोलिस विभागाने केली संयुक्त गस्त
यवतमाळ दि.18 : जिल्ह्यात कोरोना (कोव्हिड - 19) विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्तव आपत्कालीन उपाययोजना करण्याच्या उद्देशाने 16 मार्चपासून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1 ) लागू केले आहे. या कायद्याची अंमलबजाणी करण्यासाठी महसूल व पोलिस विभागाने शहरात संयुक्त गस्त करून हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा, खानावळ बंद केल्या. यानंतर रात्री आठ वाजतानंतर सदर आस्थापना बंद न केल्यास सील करण्यात येणार आहे. 
या विषाणूचा संसर्ग गर्दीतून पसरत असल्यामुळे नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट व बार, खानावळ, ढाबा रात्री आठ वाजेपर्यंत बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले आहे. त्यानुसार यवतमाळचे उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी आदींनी शहरात व शहरालगत संयुक्त मोहीम राबविली. रात्री आठनंतर ज्यांचे हॉटेल्स बंद झाले नाही त्यांना बंद करण्यात आले. तसेच यानंतर सदर आस्थापना रात्री आठ वाजतानंतर उघड्या दिसल्या तर भारतीय दंड संहिता 1960 च्या  कलम 188 कार्यवाही करून आस्थापना सील करण्यात येतील.
 ही संयुक्त मोहीम दत्त चौक, बसस्थानक परिसर, आर्णि रोड, लोहारा, धामणगाव रोड, सिव्हील लाईन, मुख्य बाजारपेठ तसेच शहराच्या चारही बाजुंनी राबविण्यात आली. या मोहिमेत यवतमाळचे उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बावीस्कर, तहसीलदार कुणाल झाल्टे, गटविकास अधिकारी, शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार धनंजय सायरे, अवदूतवाडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार अनंत वाघतकर आदींचा सहभाग होता.
कलम 144 नुसार जिल्हयातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी यवतमाळ जिल्हयामध्ये सभा, मेळावे, उपोषण, सामाजिक, सांस्कृतीक, राजकीय, धार्मीक व क्रीडा विषयक कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपले आरोग्य जपण्यासाठी गर्दी टाळावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी