बालविवाह थांबविण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक - डॉ.पंकज आशिया

Ø बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्ट: Ø या वर्षभरात जिल्ह्यात 20 बालविवाह थांबविले: Ø बालविवाह होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपक्रम : बाल विवाह ही अत्यंत अनिष्ठ प्रथा आहे. अशा विवाहाचे सामाजिक दुष्परिणाम देखील तितकेच गंभीर आहे. हे विवाह थांबविण्यासाठी समाजातील सर्वच घटकांचा सहभाग महत्वाचा आहे. शासकीय विभागांनी समाजासह विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने असे विवाह होऊच नये यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल भवन येथे बालविवाहांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजुरकर, बाल कल्याण समिती सदस्य वनिता शिरफुले, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी वनिता राजू मडावी, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी प्रदीप गोडे, चाईल्ड हेल्पलाईन समन्वयक फाल्गुन पालकर यांच्यासह सर्व तालुक्यांचे बाल विकास प्रकल्प अधिकारी, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यात यावर्षी जानेवारी ते ऑक्टोंबर या कालावधीत एकूण 20 बालविवाह रोखण्यात आले आहे. कोरोना काळात दरवर्षी 30 पेक्षा जास्त बाल विवाह जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे थांबविण्यात आले. बाल विवाह रोखणे व कारवाईपेक्षा बाल विवाहाच्या घटना घडूच नये याकरीता प्रतिबंधात्मक कार्यक्रमाची आखणी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे. दर महिन्याला याबाबत जिल्हाधिकारी आढावा घेत आहे. जिल्ह्यातील ज्या भागातून जास्त बालविवाह होतात व जेथे स्थलांतरित होणारे कुटुंब आहे अशा मारेगाव, वणी, महागाव, उमरखेड, दिग्रस व पुसद या सहा तालुक्याची निवड करण्यात आली असून या तालुक्यातील 500 अंगणवाडी क्षेत्रातील किशोरवयीन मुलींना आरोग्य, कायदे व बालकांचे अधिकार विषयी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलींचे सर्वेक्षण करून बाल विवाह होऊच नये याकरीता महिला व बाल विकास विभाग तसेच शिक्षण विभाग दक्ष राहून काम करत आहे. तालुका, गाव व वार्ड पातळीवरील बाल संरक्षण समित्या पुनर्जिवीत करणे व त्यांच्या मासिक सभा घेण्याचे निर्देश सर्व तहसीलदार, बाल विकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण कक्षाला बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बालविवाहाची माहिती 1098 वर कळवा जिल्हा प्रशासन, महिला व बाल विकास विभाग बाल विवाह प्रतिबंधासाठी सतर्कतेने काम करत आहे. बालविवाह होत असल्याचे निर्दशनास आल्यास नागरिकांनी त्याची माहिती चाईल्ड हेल्पलाईन 1098 या क्रमांकावर कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार येते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी