खाजगी ट्रॅव्हल्सचे भाडे दरपत्रक जारी

प्रवाशांकडून जादा भाडे आकारणाऱ्या चालक व मालकाविरुध्द होणार कारवाई Ø तक्रारींसाठी ईमेल, हेल्पलाईन क्रमांक;
खाजगी ट्रॅव्हल्स बसेसने आकारवयाचे महत्तम भाडे दरपत्रक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्याकडून जारी करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार खाजगी ट्रॅव्हल्स बसेस व्यावसायिकांना एसटी महामंडळाच्या समकक्ष बसेसच्या दिडपट भाडे आकारणी करता येते. प्रवाशांकडून जादा भाडे आकारण्याचे दिसून आल्यास बसच्या चालक व मालकाविरुध्द कारवाई करण्यात येईल, असे पत्रक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी काढले आहे. प्रवाशांकडून खाजगी ट्रॅव्हल्स बसेसनी अधिक भाडे आकारल्यास त्याबाबतची तक्रार ही कार्यालयातील दुरध्वनी क्र. 9404035310 व dyrto.29-mh@gov.in या ईमेलवर करता येणार आहे. बस वाहन रस्त्यावर चालत असतांना तपासणी दरम्यान प्रवाशांकडून जादा भाडे आकारण्याचे आढळून आल्यास बसचे चालक व मालकाविरुध्द नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. ८ ते २७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत एसटी महामंडळाचे प्रवास भाडे दर १० टक्के अधिक असल्याने खाजगी प्रवासी भाडे दरापेक्षा १० टक्के अधिक भाडे आकारण्याची खाजगी बस वाहतूक दारांना मुभा राहील. ही मुभा आज 8 नोव्हेंबरपासून 27 नोव्हेंबरपर्यंत राहील.सर्व खाजगी बस वाहनसेवा पुरवठादारांनी भाडे दरपत्रक तिकीट बुकिंग कार्यालयात तसेच बसमध्ये प्रर्दशित करण्याच्या सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने जारी केल्या आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी