पुसदच्या दुय्यम निबंधक कार्यालयासाठी भाडेतत्वावर जागेचे प्रस्ताव आमंत्रित

पुसद येथील दुय्यम निबंधक श्रेणी -१ कार्यालयासाठी पुसद शहरातील खाजगी इमारतीमधील जागा भाडेतत्वावर घेण्याचे प्रस्तावित आहे. सर्व सोयीसुविधा युक्त इमारतीमधील जागा भाडेतत्वावर देण्यास इच्छुक नागरिकांनी दुय्यम निबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व सोयीसुविधायुक्त असलेल्या इमारतीमधील जागेची या कार्यालयास आवश्यकता आहे. इमारत ही तहसिल कार्यालयाजवळ नजिकच्या परिसरामध्ये असावी. इमारतीमधील जागा ही तळमजल्यावर असावी. कार्यालयात येणाऱ्या पक्षकारांच्या व अधिकारी, कर्मचारी यांच्या वाहनांकरीता पार्किंग व्यवस्था असावी. इमारतीमधील जागा साधारणत: दोन हजार चौरस फुट असावी व इमारत ही आगीपासून, जीव जंतु, कीटकनाशकांपासून सुरक्षित असावी. इमारतीमधील जागेमध्ये नोंदणी कक्ष, अभिलेख कक्ष, प्रतिक्षालय कक्षासाठी सुटसुटीत जागा असावी. मुबलक पाणी व प्रसाधनगृहाची व्यवस्था असावी. सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या नियमानुसार भाडे मान्य असावे. जागा भाडेतत्त्वावर देण्यास इच्छुक नागरिकांनी तसा प्रस्ताव गजानन महाराज मंदीराजवळील सिमा महेंद्र कोतपल्लीवार यांच्या इमारतीतील दुय्यम निबंधक कार्यालयाकडे जागेच्या सर्व कागदपत्रासह सात दिवसांत सादर करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी