विधी सेवा देतांना सर्वांनी वाटा उचलावा - न्या. एस.व्ही. हांडे

राष्ट्रीय विधी सेवा दिनी कायदेविषयक शिबीर व रॅलीचे आयोजन : विधी सेवा देतांना सर्वांनी वाटा उचलणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशावरून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, यवतमाळ मार्फत 9 नोव्हेंबर हा राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त गुरुवारी कायदेविषयक शिबीराचे व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा न्यायाधीश ए.ए. लउळकर, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय टि. जैन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.ए. नहार, मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, वकील मंडळी, अमोलकचंद विधी महाविद्यालय व महात्मा जोतीबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, पॅरा विधी स्वंयसेवक उपस्थ‍ित होते.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे मार्गदर्शन करताना म्हणाले की, 11 ऑक्टोबर 1987 रोजी कायदेशिर सेवा प्राधिकरण कायदा जाहीर करण्यात आला होता व नोव्हेंबर 1995 मध्ये हा कायदा लागु करण्यात आला. यामधून समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांना कायदेविषयक मदत पुरविण्यासाठी आणि समर्थन देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामार्फत 9 नोव्हेंबर 1995 पासून ‘राष्ट्रीय विधी सेवा दिन’ या दिवसाची सुरूवात करण्यात आली. विधी सेवा देतांना सर्वांनी वाटा उचलणे आवश्यक असल्याचे न्या. एस.व्ही. हांडे यावेळी म्हणाले. यावेळी न्या. एस.व्ही. हांडे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शहरातील येथील मुख्य चौकातून रॅली काढण्यात आली व जिल्हा व सत्र न्यायालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक के.ए. नहार यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची व मोफत विधी सेवा उपलब्ध करून देण्याबाबतची त्यांनी माहिती दिली. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन तृप्ती आसावा वकील यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी