सणासुदीत खाद्य पदार्थांची तपासणी मोहीम

अन्न व औषध प्रशासनाचा पुढाकार Ø 191 नमुने तपासणीसाठी अन्न प्रयोगशाळेत अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडून यवतमाळ शहर व जिल्ह्यात सणासुदीच्या काळात किरकोळ व घाऊक अन्न पदार्थ विक्रेते तसेच हॉटेल व्यावसायिक व मिठाई उत्पादनाची तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. जनतेस सुरक्षित खाद्य पदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी शहर व संपूर्ण जिल्ह्यात अन्न व्यवसायिकांच्या तपासण्या करण्यात आल्या.या तपासणीत खाद्य तेल, मिठाई, दुध व दुग्धजन्य पदार्थ, खवा, पनीर व इतर खाद्य पदार्थांचे नियमित व सर्वेक्षण मिळून एकूण 191 नमुने तपासणीसाठी शासकीय अन्न प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आलेले आहेत. या अन्न नमुन्यांचे कार्यालयास प्राप्त अहवालापैकी खाद्य तेलाचे दोन, पनीर एक, दुध एक व इतर खाद्य पदार्थाचे पाच अहवाल अप्रमाणित आलेले आहेत. अप्रमाणित अहवालावर नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक व मिठाई उत्पादक तसेच विक्रेत्यांना जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न पदार्थ तयार करण्याची जागा, साठविण्याची जागा स्वच्छ ठेवणे, मिठाई तयार करण्याचे टेबल व बाक, खाद्य पदार्थ भांडे, अन्न पदार्थ वितरीत करावयाच्या प्लेट्स स्वच्छ ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अन्न पदार्थ हाताळणाऱ्या अन्न व्यावसायिक व कामगारांनी सुयोग्य, स्वच्छ, स्वरक्षीत कपडे, टोपी, गरज असल्यास हातमोजे याचा वापर करावा. जनतेला ताजे, सुरक्षीत अन्न मिळावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त गोपाल माहोरे यांनी अन्न व्यवसायिकांना केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी