कपाशीवरील लष्करी अळीचे व्यवस्थापन करावे

कापूस पिकावर लष्करी अळी (स्पोडोप्टेरा) चा प्रादुर्भाव आढळून येत असल्यास शेतकऱ्यांनी कापूस पिकामध्ये प्रौढ नर पतंग जेरबंद करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा.तसेच प्रती हेक्टरी ४ ते ५ प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने केले आहे. लष्करी अळीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने मुख्य शेत तणविरहीत ठेवणे तसेच आजुबाजूचे क्षेत्र स्वच्छ ठेवावे. किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास लगेच कापूस पिकावर मेटाऱ्हायझियम ॲनिसोप्लि किंवा बिव्हेरिया बेसीयाना 1.15 टक्के डब्ल्यु पी हे बुरशीजन्य कीटकनाशक 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यावर स्पिनेटोरम 11.7 टक्के एससी 0.82 मिली किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 टक्के एससी 0.3 मिली किंवा नोव्हालुरॉन 8.80 टक्के एससी एक मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के एसजी 0.4 ग्रॅम किंवा क्लोरपायरीफॉस 50 टक्के + सायपरमेथ्रीन 5 टक्के इसी 2 ते 4 मिली यापैकी कोणत्याही एका किटकनाशकांची प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी