नागपूर येथे पं. दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे 2 व 3 डिसेंबरला आयोजन

उद्योजकांनी रिक्तपदाचा तपशिल सादर करण्याचे आवाहन : नागपूर येथे दि. 2 व 3 डिसेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील उद्योजकांनी विभागाच्या रोजगार महास्वयंम या पोर्टलवर रिक्तपदे अधिसुचित करुन रिक्तपदाचा तपशिल जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उद्योग भवन,चौथा माळा, दारव्हा रोड, यवतमाळ या कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कौशल्य रोजगार व उद्योजकता नाविण्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देणे तसेच उद्योजकांना आवश्यक कुशल मनुष्यबळ प्राप्त होण्याच्या उद्देशाने नामांकित उद्योजक तथा इंडस्ट्रिज यांच्यासाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहे. रिक्तपदाचा तपशिल तक्त्यात भरुन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उद्योग भवन,चौथा माळा, दारव्हा रोड, यवतमाळ या कार्यालयात सादर करावा तसेच रोजगार महास्वयंम या पोर्टल सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी सेवायोजन कार्डमधील प्रोफाईलमध्ये जावून शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्तपदाच्या बाजुच्या ‘अल्पाय’ या टॅबला क्लिक करावे, असे आवाहन सहायक आयुक्त वि. सा. शितोळे यांनी केले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी