शासन आपल्या दारी कार्यक्रमात यशस्वी उद्योजकांचा सन्मान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व धनादेशाचे वाटप :
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत लोहारा येथील यशस्वी उद्योजक लक्ष्मीकांत भोंबे आणि श्री. वि. राठोड यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व धनादेश देवून सन्मानित करण्यात आले. यवतमाळ शहराजवळील किन्ही येथे शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शासकिय योजनाचा लाभ घेवून स्वत:च्या व्यवसायाची सुरुवात करण्याऱ्या लक्ष्मीकांन्त भोंबे यांच्या संकल्प आणि जिद्दीचे कौतुक करुन मुख्यमंत्र्यानी भोंबेंचा भव्य कार्यक्रमात सन्मान केला.भोंबें यांनी पापड उद्योगासाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत युनियन बँकेकडे कर्ज प्रकरण दाखल केले होते. या कर्ज प्रकरणाला बँक आणि खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मंजुरी मिळाली. त्यानंतर भोंबे यांनी स्वत:चा उद्योग उभारला.
याचबरोबर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत यवतमाळ येथील श्री. वि. राठोड यांनीही कर्ज प्रकरण करुन स्वत:चा उद्योग उभारला आहे. लक्ष्मीकांत भोंबे आणि श्री. वि. राठोड यांचा उद्योग यशस्वीपणे सुरु आहे. या उद्योजकांचा शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होणे हे उद्योग करु इच्छिणाऱ्या युवक युवतींना प्रेरणादायी ठरत आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेवून उद्योजक बनण्याचे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी