तेलंगणा सीमेपासून जिल्ह्यातील पाच किमी क्षेत्रात मद्यविक्रीस बंदी

Ø जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी : भारत निवडणूक आयोगाद्वारे तेलंगणा राज्यात सार्वजनिक विधानसभा निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणूक क्षेत्रात मतदान दि. 30 नोव्हेंबर रोजी व मतमोजणीची प्रक्रिया 3 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर तेलंगणाच्या सीमेपासून यवतमाळ जिल्ह्यातील पाच किलोमीटर क्षेत्रात दि. 28 ते 30 नोव्हेंबरपर्यंत व मतमोजणीच्या दिवशी सर्व किरकोळ मद्यविक्रीस बंदी असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी काढले आहे. या निवडणुका खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान प्रक्रिया संपण्याच्या 48 तास अगोदर पासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मद्यविक्री करण्यास मनाई किंवा कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत लोकप्रतिनिधीत्व अधिनियमान्वये तरतूद आहे. तसेच तेलंगणा राज्याच्या सीमेजवळील महाराष्ट्रातील जिल्ह्याला लागून पाच किमीच्या क्षेत्रात मद्यविक्रीस मनाई किंवा कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत निर्देश दिलेले आहे. त्यानुसार तेलंगणा राज्याच्या सीमेपासून यवतमाळ जिल्ह्यातील पाच किमी क्षेत्रातील सर्व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवणे आवश्यक आहे. महाराष्ट्र देशी दारू नियम, महाराष्ट्र विदेशी मद्य विक्री नियमाप्रमाणे तसेच भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार तेलंगणा राज्याच्या सीमेपासून यवतमाळ जिल्ह्यातील पाच किमी क्षेत्रातील दि. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपासून ते 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत व मतमोजणीच्या दिवशी प्रक्रिया संपेपर्यंत सर्व किरकोळ मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी काढले आहे. सर्व मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांनी तेलंगणा राज्याच्या सीमेपासून यवतमाळ जिल्ह्यातील पाच किलोमीटर सीमेपर्यंत हद्दीतील संपूर्ण देशी, विदेशी व बिअर विक्रीची दारू दुकाने निवडणूक कालावधीत मद्यविक्री करण्यास बंद ठेवाव्यात. या आदेशाचा भंग करणाऱ्या संबंधित अनुज्ञप्तीधारकाविरूद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी