हरभरा पिकावरील मररोगाचे व्यवस्थापन करावे

जिल्ह्यातील काही भागांमध्ये हरभरा पिकावरील मररोग व स्पोडोप्टेरा, तंबाखुचे पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. परंतु शेतकऱ्यांनी यासाठी घाबरण्याची आवश्यकता नाही. या रोगांच्या नियंत्रणासाठी कृषि विज्ञान केंद्र व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कार्यालयामार्फत उपाययोजनांची शिफारस करण्यात केली आहे. या शिफारशीनुसार हरभरा पिकावरील मररोगाच्या व्यवस्थापनाकरीता ट्रायकोडर्मा २ किलो प्रति ४० किलो शेणखतात मिसळुन प्रति एकरी समप्रमाणात टाकावे. हरभऱ्यावरील स्पोडोप्टेरा, तंबाखुचे पाने खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थानासाठी निबोळी अर्क ५ टक्के किंवा एचएएनपीव्ही (1 x 10 पीओबी प्रति मिली) ५०० एलई प्रति हेक्टर किंवा क्विनॉलफॉस २५ ईसी २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रनिलीप्रोल १८.५ टक्के एससी २.५ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ४.४ ग्रॅम किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ टक्के इसी ६.६ मिली किंवा लॅम्बडा सायहालोथ्रीन ५ टक्के इसी ८ मिली किंवा फ्युबेन्डामाइड ८.३३ टक्के + डेल्टामेथ्रीन ५.५६ टक्के एससी ५ मिली किंवा नोवालुरोन ५.२५ टक्के + इंडोक्झाकार्ब ४.५ टक्के एससी १६.५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, या शिफारशी करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे हरभरा पिकावरील मररोग व स्पोडोप्टेरा, तंबाखूचे पाने खाणाऱ्या अळीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी