अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन

इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेन्शिअल पब्लिक स्कूल मध्ये प्रवेशाकरीता प्रवेश परीक्षा दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी मा. अप्पर आयुक्त आदिवासी विकास अमरावती यांचे अधिनस्त असलेल्या प्रकल्प कार्यालया अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगर पालिकांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता आयाजित करण्यात येत आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा अंतर्गत सदर प्रवेश परीक्षा शासकीय आश्रमशाळा शिबला, ता. झरी जि. यवतमाळ व शासकीय आश्रमशाळा अंतरगांव ता.कळंब जि. यवतमाळ या परीक्षा केंद्रावर दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी 11 ते 1 या कालावधीत घेण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षेकरीता विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज पांढरकवडा प्रकल्प कार्यालय व कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रम शाळांच्या मुख्याध्यापकांकडे विनामुल्य उपलब्ध आहेत. करीता या कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या तालुक्यांतील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हापरिषद, नगरपालिका तथा नगरपरिषदांच्या प्राथमिक तथा माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य प्राथमिक तथा अनुदानित शाळांमध्ये शैक्षणिक सत्र 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी, 6 वी, 7 वी, 8 वी मध्ये शिकत असलेल्या अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे पूर्ण भरलेले विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी दि. 17 फेब्रुवारी पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा येथे सादर करावे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी