महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमात जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर अग्रेसर करावे - डॉ पंकज आशिया

जिल्हास्तरीय सादरीकरण सत्राचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमात जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर अग्रेसर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी केले. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टुडन्ट इनोवेशन चॅलेंज उपक्रमाच्या जिल्हास्तरीय सादरीकरण सत्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्या हस्ते १२ डिसेंबर रोजी करण्यात आले. येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आयोजन करण्यात आले होते. या सत्राच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी जी.यु. राजूरकर उपस्थित होते. या सादरीकरण सत्रासाठी एकूण ३३ इनोव्हेंटर्सपैकी २५ इनोव्हेटर्स उपस्थित होते. या इनोव्हेटर्सना मुल्यांकन करण्यासाठी १७ ज्युरी मेंबर्स उपस्थित होते. उमेदवारांनी सादरी केलेल्या नाविन्य संकल्पना जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता राज्यस्तरावर सादरीकरण करून यवतमाळ जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर अग्रेसर करावे, असे आव्हान जिल्हाधिकारी डॉ आशिया यांनी यावेळी केले. महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमात सहभागी इनोव्हेटर्सना नावीन्यपूर्ण संकल्पनांच्या सादरीकरणाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीत्यासाठी शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्हि. जे. नागोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या सा. शितोळे यावेळी उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी