प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना फसव्या संकेतस्थळापासून सावध राहण्याचे महाऊर्जातर्फे आवाहन

महाऊर्जामार्फत महाकृषी ऊर्जा अभियानाच्या पी.एम.कुसुम योजना घटक-ब योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 3, 5 व 7.5 अश्वशक्ती क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषी पंप देण्यात येत आहेत. याकरीता शेतकऱ्यांचे अर्ज अधिकृत ऑनलाईन लिंक व्यतिरिक्त महाऊर्जामार्फत कोणत्याही प्रकारे स्वीकारण्यात येत नाहीत. त्यामुळे खोट्या किंवा फसव्या संकेतस्थळांना, फसव्या दुरध्वन व भ्रमणध्वणीच्या संभाषणाला,आवाहनाला शेतकऱ्यांनी बळी पडु नये व अशा संकेतस्थळावर,ॲपवर कोणत्याही पध्दतीने पैशाचा भरणा करु नये, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक, महाऊर्जा अमरावती यांच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत सौर कृषी पंपासाठी पात्र लाभार्थ्यांना सौर पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांस 10 टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांस 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीचा एसएमएस पाठविला जातो. ही योजना राबविण्याकरीता महाऊर्जामार्फत स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आले असून लाभार्थी शेतकऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळांचा उपयोग नोंदणी व इतर माहिती प्राप्त करण्यासाठी करावा. https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B, https://kusum.mahaurja.com/beneficiary/ या ऑनलाईन लिंक व्यतिरिक्त महाऊर्जामार्फत कोणत्याही प्रकारे स्वीकारण्यात येत नाहीत. परंतु सद्य:स्थितीत वेगवेगळ्या बनावट वेबसाईट, सोशल मिडीया प्लॅटफार्म इत्यादींमार्फत शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करण्यात येत असल्याचे तसेच शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी खोटे संदेश पाठविण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा खोट्या किंवा फसव्या संकेतस्थळांना, फसव्या दुरध्वन व भ्रमणध्वणीच्या संभाषणाला,आवाहनाला शेतकऱ्यांनी बळी पडु नये व अशा संकेतस्थळावर,ॲपवर कोणत्याही पध्दतीने पैशाचा भरणा करु नये, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक, महाऊर्जा अमरावती यांच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा कार्यालय, महाऊर्जा, यवतमाळ दुरध्वनीवर संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी