यवतमाळच्या जिल्हा स्त्री व बाल रुग्णालयात विविध सुविधा : नागरिकांना सुविधांचा लाभ घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन

यवतमाळ येथे ऑगस्ट 2022 पासून जिल्हा स्त्री व बाल रुग्णालय यवतमाळ येथे समता मैदान, तिरंगा चैक यवतमाळ येथे सुरु करण्यात आलेले आहे. या रुग्णालयामध्ये महिला व बालकांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. या रुग्णालयात गर्भवती महिला (एएनसी) संबंधित संपूर्ण आरोग्य तपासणी (रक्त चाचणी, रक्त सक्रंमप पुरवठा, सोनोग्राफी, आहार सुविधा, गर्भपात (एमटीपी), प्रसुती (डिलेव्हरी) प्रसुती शस्त्रक्रिया (एलएससीएस) गर्भवती महिलांना समुपदेशन करण्यात येते. तसेच इतर सुविधा कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया (फॅमिली प्लॅनिंग) मैत्री क्लीनिक, जननी सुरक्षा योजनेचा लाभ, नियमीत लसीकरण, याबाबत च्या सूविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहे. यवतमाळ शहर व ग्रामीण भागातील गर्भवती महिला यांनी शासकीय जिल्हा महिला व बाल रुग्णालय यवतमाळ यांचा लाभ घेण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड व वैद्यकिय अधिक्षक, महिला व बाल रुग्णालय यवतमाळ डॉ. रवि पाटील यांनी कळविण्यात आलेले आहे. या मुळे ग्रामीण भागातील व शहरी भागातील जनतेने लाभ घ्यावा. जिल्हा महिला व बाल रुग्णालय, यवतमाळ येथे बाह्यरुग्ण व अंतररुग्ण, प्रसुती गर्भवती आरोग्य तपासणी करण्यात येते व अत्यावश्यक सेवा हि (२४ X ७) सुरु राहातील. सदर रुग्णालयात माहे ऑगस्ट २०२२ ते ऑक्टोबर २०२३ पर्यंत पुढिल प्रमाणे सोईसुविधा पुरविण्यात आलेल्या आहे. त्यामध्ये ओपीडी- 8 हजार 111, एनसी-3 हजार 759, आयपीडी- 1 हजार 516, सोनोग्राफी- 414, डिलेव्हरी-379, एलएससीएस-1, जेएसवाय-118, इम्युनायझेशन (आयरन सुक्रोस, “ओ” पोलिओ, बीसीजी, हीपॅटिसीस बी, आरआय)- 1 हजार 7, ब्लड ट्रान्सफ्युजन-68, फॅमिली प्लॅनिंग-8 आशा सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी