ईव्हीएम व व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक केंद्राचे आज उद्घाटन मतदारांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिमेचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी

निवडणूक विभागाच्या नविन इमारतीमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक केंद्राचे आज दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित ईव्हीएम प्रात्यक्षिक समजून घेण्यासाठी सामान्य जनतेने मोठ्यासंख्येने या केंद्रास भेट द्यावी व शासनाच्या मोहिमेस आवश्यक सहकार्य करावे. तसेच मतदारांनी या जनजागृती मोहिमेचा लाभ घ्यावा, आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या पत्रानुसार जनजागृती कार्यक्रमाचे वेळापत्रक या कार्यालयास कळविण्यात आलेले आहे. निवडणूक घोषीत करण्याच्या ३ महिने अगोदर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती मोहीम राबविण्यात यावी. या अनुषंगाने जनजागृती मोहीमेचे वेळापत्रक अथवा आराखडा तयार करणेबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र आणि मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅन जनजागृती मोहिमेचे वेळापत्रक राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षांना पाठविण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रामध्ये बॅनर, प्रात्यक्षिक टेबलाजवळ आणि पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. प्रात्यक्षिक आणि जागरुकता कार्यक्रमासाठी मानक कार्यप्रणाली तंतोतंत राबविण्यात येईल. प्रात्यक्षिक दाखविल्यानंतर तयार होणाऱ्या व्हीव्हीपॅटच्या स्लीप दररोज ड्रॉप बॉक्स मधून काढून त्या पेपर शेडर वापरुन नष्ट करण्यात येतील. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भातील जनजागृती मोहीम माहे फेब्रुवारी, २०२४ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या मोहिमेचा कार्यपुर्ती अहवाल आयोगाकडे सादर करावयाचा असल्यामुळे नमुना-१ मधील अहवाल व माहिती दर सोमवारी आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे. निवडणूक घोषीत केल्यानंतर प्रात्यक्षिक दाखविण्याची मोहीम बंद करण्यात येईल. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रे स्थापन करण्यात आली आहे. ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रे निवडणूक होईपर्यंत कार्यरत ठेवण्यात येणार आहे, असे निवडणूक विभागाकडून कळविण्यात आले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी