महाडीबीटी पोर्टलवरील निवड झालेल्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करावी

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवरील निवड झालेल्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे. यवतमाळ जिल्ह्यात फलोत्पादन व भाजीपाला पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्याकरीता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना राबविण्यात येत आहे. फलोत्पादन पिकाचा संशोधन तंत्रज्ञान, प्रसार काढणीत्तोर तंत्रज्ञान, प्रक्रिया व पणन सुविधा यांच्या माध्यमातून समूह पध्दतीने सर्वांगीण विकास करणे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे, पारंपरिक उत्पादन पध्दतीची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाची सांगड घालून तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार आणि प्रचार आदी या योजनेचे उद्दीष्ट आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत १४ व्या लॉटरी सायकलमध्ये महाडीबीटी प्रणालीवर मोठ्या संख्येने लाभार्थी निवड झालेली आहे. या नव्याने निवडलेल्या लाभार्थीनी नजीकच्या सीएससी सेंटर तसेच संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांना प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि आपले आवश्यक कागदपत्रे तात्काळ अपलोड करुन घ्यावीत. या योजनेतंर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांचे विविध घटकासाठी निवड झालेली आहे. यात प्रामुख्याने क्षेत्र विस्तार व पुनरुज्जीवन, मिरची लागवड, पॅकहाऊस, शेडनेट हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग, कांदाचाळ इत्यादी घटकाकरिता मोठ्या संख्येन लाभार्थी निवड झालेली आहे, त्या नविन निवड झालेल्या लाभार्थ्यांनी आपली आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी