शास्त्रोक्त मधमाशी पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सात दिवसीय निवासी शास्त्रोक्त मधमाशी पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन ४ डिसेंबर रोजी यवतमाळ येथील कृषी विज्ञान केंद्र येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. सुरेश उ. नेमाडे, कृषी उपसंचालक टी. एस. चव्हाण, उद्यानपंडीत पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी जगदीश चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी शेतीला पूरक उद्योग म्हणून शेतकरी बांधवांनी मधमाशी पालनाकडे वळावे, असे आवाहन केले. तसेच मधमाशी पालनाच्या आर्थिक उत्पादनाविषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर यांनी कार्यक्रमाचे महत्त्व व उद्देश विषद केला. कार्यक्रमाचे अतिथी कृषी विज्ञान केंद्र वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. सुरेश उ. नेमाडे यांनी मधमाशी पालन पिकाच्या वाढीविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन कृषी विभागाचे तंत्र अधिकारी भागवत खरात यांनी केले. तर आभार तंत्र सहायक गजानन सोनकुसरे यांनी मानले. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ मयूर ढोले, शास्त्रज्ञ राहुल चव्हाण, शास्त्रज्ञ डॉ. गणेश काळूसे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ विशाल राठोड उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल कडू, भरतसिंग सुलाणे यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी