आयटीआयमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन

शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे १२ डिसेंबर रोजी सकाळी 9.३० वाजता प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या भरती मेळाव्याकरीता आयजीडब्लु इंडिया टेकनॉलॉजी प्राव्हेट लिमिटेड पुणे व भारतामधील प्लास्टिक पाईप्सचे उत्पादन करणारी फिनोलेक्स पाईप्स लिमिटेड, पुणे उपस्थित राहणार आहेत. आयजीडब्लु इंडिया टेकनॉलॉजी प्राव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मेट्रो ट्रेनचे गियर बॉक्स तयार केले जातात. या कंपनीमध्ये सर्व व्यवसायातील उमेदवारांकरीता शिकावू उमेदवारीच्या संधी उपलब्ध आहेत. या कंपनीमध्ये शिकावू उमेदवारी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचे भविष्य उज्वल राहणार आहे. फिनोलेक्स पाईप्स लिमिटेड पुणे या कंपनीमध्ये प्लास्टिक पाईप्स उत्पादन केले जाते. या कंपनीमध्ये फिटर, टर्नर मशिनिस्ट या व्यवसायातील मुला मुलींकरीता शिकावू उमेदवारी उपलब्ध आहे. भारतातील अग्रगण्य आस्थापना १२ डिसेंबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे उपस्थित राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण उमेदवारासाठी ही सुवर्णसंधी संस्थेने उपलब्ध करून दिलेली आहे. या संधीचा लाभ प्रत्येक पात्र उमेदवाराने घ्यावा व स्वतःची यशस्वी कारकीर्द सुरू करावी. प्रशिक्षणार्थी यांनी बायोडाटा व मूळ कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य व्ही.जे. नागोरे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी