यंदाची जागतिक कौशल्य स्पर्धा फ्रान्समध्ये होणार : नवयुवकांना सहभागी होण्याची संधी

Ø 20 डिसेंबर पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन जगभरातील नवयुवकांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देणारी जागतिक कौशल्य स्पर्धा यंदा फ्रान्समधील ल्योन येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून जिल्ह्यातील नवयुवकांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नवयुवकांनी आज 20 डिसेंबर पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि हि जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरुणाकरिता त्याच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पिक खेळासारखीच आहे. यापूर्वी 46 जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये 62 सेक्टर मधून 50 देशातील 10 हजार उमेदवार समाविष्ट असून सदर स्पर्धा 15 देशात 12 आठवड्यासाठी आयोजित करण्यात आली होती. नव्या वर्षामध्ये आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 52 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, कौशल्य परिषद, विविध औद्यागिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद यांच्यामार्फत स्पर्धा आयोजित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या असून या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर करून निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी प्रतिभा संपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने सर्व आयएमएस, पॉलिटेक्निक, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग टूल्स रूम, सीआयपीईटी, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालय, आयएचएम किंवा हॉस्पिटॅलिटी संस्था, कॉर्पोरेट तांत्रिक संस्था, कौशल्य प्रशिक्षण संस्था, महाविद्यालये, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, एमएसबीव्हीटी, खाजगी कला महाविद्यालय, फ्लॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, इन्स्टिट्यूट ऑफ ज्वेलरी आणि इतर प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी उमेदवारांना नोंदणी करुन सहभागी व्हावे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता कौशल्य महास्वयंम http://kaushalya.mahaswayam.gov.in या लिंकवर रजिस्ट्रेशन करावे तसेच अधिक माहितीसाठी https://www.msde.gov.in/en/competition-awarsd/worldskills या संकेतस्थळाला भेट देऊन 20 डिसेंबर पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी