राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह १४ ते २० डिसेंबरदरम्यान

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढविणे व ऊर्जा संवर्धनासाठी “राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह दि. १४ ते २० डिसेंबरदरम्यान राबविण्यात येत आहे. या सप्ताहात जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत ऊर्जा संकट व अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापराविषयी जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती महाउर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी दिली. नवीन व नवीकरणीय ऊर्जेचे तसेच ऊर्जा बचतीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. आजही जवळपास ६० टक्केपेक्षा जास्त ऊर्जा निर्मिती ही औष्णिक ऊर्जा निर्मिती पध्दतीने केली जाते. तथापि पारंपरिक पध्दतीने ऊर्जा निर्मिती करतांना पर्यावरणामध्ये ग्रीन हाऊस गॅसेस सोडले जातात. यामध्ये कार्बन, क्लोराईड, नॉयट्रोजन, सल्फेट यांचा अंतर्भाव असतो. या वायुंचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असून जागतिक उष्णतामान वाढत आहे. याची आपण सर्वांना जाणीव आहे. पारंपरिक ऊर्जा निर्मितीचे स्त्रोत सिमीत असल्याने सद्य:स्थितीत नित्यनूतनशील ऊर्जा व ऊर्जा बचतीशिवाय पर्याय नाही. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहामध्ये शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमार्फत ऊर्जा संकटाबाबत जनतेमध्ये जनजागृती तसेच अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापराविषयी प्रबोधनात्मक संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी