नागपूर येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन

उद्योजकांना रिक्तपदाचा तपशिल सादर करण्याचे आवाहन पंडित दीनदयाल उपाध्याय नमो महारोजगार मेळाव्याचे दि. ९ व १० डिसेंबर रोजी नागपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य रोजगार व उद्योजकता नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या निर्देशानुसार राज्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार व उद्योजकांना कुशल मनुष्यबळ आणि नामांकित उद्योजक तथा इंडस्ट्रिजसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचे दिले आहे. नागपूर येथील जमनालाल बजाज प्रशासकिय भवन, नागपूर विद्यापीठ येथे नमो महारोगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील उद्योजकांनी विभागाच्या रोजगार महास्वयंम rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर रिक्तपदे अधिसूचित करावीत. तसेच रिक्तपदाचा तपशिल जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उद्योग भवन, चौथा माळा, दारव्हा रोड, यवतमाळ या कार्यालयात सादर करावा. तसेच सुशिक्ष‍ित बेरोजगार उमेदवारांनी रोजगार महास्वयंम या पोर्टलवर सेवायोजन कार्डमधील प्रोफाईलमध्ये जावून आपले शैक्षणिक पात्रतेनिहाय अर्ज करावे, असे आवाहन सहायक आयुक्त वि. सा. शितोळेयांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी