लोकशाही दिनातील तक्रारी निकाली काढा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

121 तक्रारी प्राप्त जिल्हास्तरीय लोकशाही दिनात एकूण १२१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व तक्रारी आणि प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे जिल्हाधिकारी डॅा. आशिया यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी शहरी, ग्रामीण भागातील सामान्य नागरीक, महिला, ज्येष्ठ नागरीक, व्यावसायिकांनी केलेल्या लेखी तक्रारी स्वत: ऐकुन त्यावर संबंधित विभागाच्या प्रमुखांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिला. तसेच विविध विभागातील ना हरकत प्रमाणपत्रांसाठी नागरिक लोकशाही दिनात अर्ज करत आहेत. ना हरकत प्रमाणपत्र मागणीचे प्रकरण प्रलंबित ठेवू नका. एनओसीसाठी नागरिकांना लोकशाही दिनात येण्याची गरज पडू नये यासाठी अधिकाऱ्यांनी एनओसीचे प्रकरण त्यांच्या स्तरावर निकाली काढावे. असे निर्देश देखील जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय आता ऑनलाईन टपाल स्विकारणार
राज्य शासनाने यापूर्वीच ई-ऑफीस प्रणालीचा अवलंब केला आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागांना ई-ऑफीस प्रणालीचा वापर वाढवावा. जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक विभागांचे टपाल, नागरिकांच्या तक्रारी व त्यांचा अहवाल, निवेदन स्विकारले जातात. यासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयाने ई-ऑफीस प्रणालीचा वापर वाढविण्यावर भर दिला असून जिल्हा प्रशासनातील विविध विभागांनी ई-प्रणालीव्दारे ऑनलाईन टपाल पाठवावे. कोणतेही टपाल ऑफलाईन घेण्यात येणार नाही, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी लोकशाही दिनात अधिकाऱ्यांना दिल्या.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी