पांढरकवडा येथे भव्य रोगनिदान शस्त्रक्रिया व दंतचिकित्सा शिबीर

पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पांढरकवडा परिसरातील जनतेकरिता आरोग्य सेवा व भव्य रोगनिदान शस्त्रक्रिया व दंतचिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. अकोल्याचे उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे, वसंतराव नाईक शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, यवतमाळचे अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये आदिवासी भागातील रुग्णांना मुख्यत्वे करून ज्या रुग्णांना शस्त्रक्रीयेची गरज आहे परंतु ते जिल्हा स्तरावर जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी विशेष तज्ञ उपलब्ध करून उपजिल्हा रुग्णालय, पांढरकवडा येथे शस्त्रक्रिया केल्या जातील तरी जनतेने या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिराचे वैशिष्टेः शिबिरामध्ये हर्निया, हायड्रोसील, अपेंडिक्स व शरीरातील इतर गाठींचे तसेच अस्थी रुग्णाची तपासणी करून शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येईल. दंत विकार, मुखरोग व कर्करोग असणाऱ्या रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात येईल. शिबिरामध्ये बालरुग्ण, कुपोषित बालक, मतीमंद बालक, शालेय आरोग्य तपासणी मधील बालक, बालकाचे जन्मतः सर्व आजारांवर तज्ञकडून निदान करून उपचार करण्यात येईल. शिबिरामध्ये स्त्री रुग्णांची गरोदर मातांची तपासणी गर्भाशयाचे विकार स्तनाच्या गाठी पाळीचा त्रास यासर्व निदान करून सिझेरियन व इतर शस्त्रक्रिया केल्या जातील. मोतीबिंदु व डोळ्यांचे आजार इत्यादीवर तसेच नाक, कान घसा यांचे विविध आजार इत्यादीवर निदान व उपचार करण्यात येईल. मधुमेह, रक्तदाब हृदयविकाराचे रुग्ण व इतर आजार इत्यादीवर निदान व उपचार करण्यात येईल. शिबिरामध्ये क्षकिरण ईसीजी व रक्ताच्या विविध चाचण्या व एचआयव्ही ची तपासणी निशुल्क करण्यात येईल. शिबिरामध्ये श्री. वसंतराव नाईक शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, यवतमाळ व जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर सेवा देणार आहेत. मानसिक आजारावर मार्गदर्शन व उपचार करण्यात येईल. शिबिरामध्ये नोंदणीकृत रुग्णांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, असे उपजिल्हा रुग्णालय, पांढरकवड्याचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. व्ही. एच. सातुरवार यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी