चारा पिके उत्पादनासाठी शेतकऱ्यांना एक रुपयात जमीन

राज्यातील दुष्काळी परिस्थिती विचारात घेता जनावरासाठी गाळपेर, चारा पिके उत्पादनासाठी शेतकऱ्यांना जलाशयातील, तलावाखालील जमीन नाममात्र एक रुपये दराने भाडेपट्ट्यावर देण्यात येणार आहे. गाळपेर जमिनीमध्ये जनावरासाठी सुयोग अशी वैरण व चारा पिके मका, ज्वारी व बाजरी किंवा वैरण समृध्द पिके जसे न्युट्रिफीड व तत्सम घेण्यात यावी. चारा पिके, वैरण पिके घेण्यासाठी पशुसवर्धन विभागामार्फत विभागाच्या विविध योजनामधून बियाण्यांची विनामुल्य उपलब्धता करुन देण्यात येईल. गाळपेर जमिनीवर घेण्यात येणाऱ्या वैरण पिकासाठी जलाशयातील पाणी विनामुल्य उपलब्ध राहील तसेच उपसासनाही परवानगी देण्यात येईल. त्यासाठी कोणतीही पाणीपट्टी आकारण्यात येणार नाही. राज्य शासनाच्या कृषी व पदुम शासन निर्णय अटी व शर्तीला अधिन राहुन प्राधान्य क्रमाने लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. याबाबत सविस्तर माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, यवतमाळ अधिक्षक अभियंता (सिंचन), जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कार्यकारी अभियंता मृद व जलसंधारण कार्यालय यवतमाळ येथे संपर्क करावा. लाभार्थ्यांनी दि २२ डिसेंबरपर्यंत विहित नमुन्यात जलसंपदा, जलसंधारण, तालुका कृषी कार्यालय, पशुधन विकास अधिकारी या विभागाच्या कोणत्याही एकाठिकाणी तालुकास्तरीय कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन त्याठिकाणी लाभार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज भरुन सादर करावे, असे अवशन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. विजय राहाटे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी