तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांची शासकीय तंत्रनिकेतनला भेट

तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी संस्थांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याचे केले आवाहन राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी यवतमाळच्या शासकीय तंत्रनिकेतन आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला शनिवारी दि.९ डिसेंबरला भेट दिली. यावेळी त्यांनी तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी संस्थांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याचे आवाहन केले. या भेटीदरम्यान त्यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण केले.तसेच पदविका आणि पदवी महाविद्यालयातील प्राध्यापकांना दोन संस्थांमध्ये समन्वय स्थापित करण्याचा सल्ला दिला. त्यांनी संस्थेच्या फेसलिफ्टिंगच्या प्रस्तावांवरही चर्चा केली आणि यवतमाळच्या शासकीय तंत्रनिकेतनमधील सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या शाखेतील अभ्यासक्रमांसाठी नवीन उपकरणे खरेदी बाबत निर्देश दिले. सांघिक कामात सुधारणा करण्यावर त्यांनी भर दिला. संस्थेतून बाहेर पडताना त्यांनी परिसर विकास उपक्रमांची पाहणी केली व मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत अमृतवाटीकाचे संचालक यांच्या हस्ते करून वृक्षारोपण करण्यात आले. या भेटीदरम्यान अमरावतीचे विभागीय सहसंचालक डॉ. विजय मानकर, नागपूरचे विभागीय सहसंचालक डॉ. मनोज डायगव्हाणे, तंत्रशिक्षणचे सहायक संचालक श्रीकांत मडावी, डॉ. धनंजय पर्बत, प्राचार्य डॉ.आर.पी. मोगरे, प्राचार्य प्रा. व्ही.बी.वाघमारे व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी