लाभार्थ्यांच्या खात्यात आता ऑलनाईन पध्दतीने थेट रक्कम

Ø जिल्हा परिषद अंतर्गत डीबीटी संकेतस्थळाचे उद्घाटन
यवतमाळ, दि. 18 : राज्य शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवून लाभार्थ्यांच्या खात्यात ऑनलाईन पध्दतीने थेट रक्कम जमा करणे आता शक्य होणार आहे. यासंदर्भात विकसीत करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद येथील स्व. वसंतराव नाईक सभागृहात लाभाचे थेट हस्तांतरण (डीबीटी) उपक्रमाच्या उद्घाटन समारंभाला  समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, आयसीआयसीआय बँकेचे शाखा प्रबंधक राहुल लढ्ढा, प्रादेशिक कार्यालयाचे शाखा प्रबंधक प्रदीप बरडे, प्रतिम गजभिये, कौशल भोजानी, अशोक मांडविया आदी उपस्थित होते.
या संकेतस्थळामुळे जिल्हा परिषद अंतर्गत येणारे कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, समाजकल्याण विभाग आणि महिला व बालकल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणा-या राज्य शासनाच्या व जिल्हा परिषद सेसच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल. तसेच अर्ज सादर करण्यापासून ते लाभार्थ्यांच्या थेट खात्यात रक्कम जमा होण्याची पारदर्शक प्रक्रिया जलद गतीने पार पाडण्यास जिल्हा परिषद प्रशासनास मदत होईल. सदर संकेतस्थळ www.zpdbtyavatmal.in असून या संकेतस्थळावर लाभार्थ्यांना 21 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत अर्ज सादर करता येईल व योजनानिहाय लाभ घेता येईल. हे संकेतस्थळ वडोदरा येथील लॉजीकल विंग्ज इन्फो वेब प्रा. लि. चे कौशल भोजानी आणि अशोक मांडविया यांनी विकसीत केले आहे. डीबीटी संकेतस्थळ विकसीत करणारी यवतमाळ ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद आहे.
कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश भुयार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सानप,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, उपमख्य लेखा अधिकारी डॉ. विजय देशमुख, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. खेरडे, समाजकल्याण अधिकारी मंगला मून, महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, लेखाधिकारी उमेश पकाले, राजेंद्र ठाकरे यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                                        000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी